Drip Irrigation Subsidy Scheme : सुक्षसिंचनाला मिळणार 80% अनुदान काय असणार आहे पात्रता; पहा शासन निर्णय

Drip Irrigation Subsidy
Drip Irrigation Subsidy

Drip Irrigation Subsidy Scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर,शासकीय जीआर असो,शेती विषयक योजना,शेतकरी योजना व त्यांचे अपडेट वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता देखील अशाच एक महत्त्वपूर्ण अशा सूक्ष्म सिंचन अनुदान योजनेचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत.

कोण आहे पात्र?

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर,शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी एक योजना आहे.आणि ती म्हणजे सूक्ष्म सिंचन योजना आणि याचे अर्ज हे शेतकरी भरत असतात.आणि अशाच प्रकारे आपण पाहिलं तर 2021-22 मध्ये महा-डीबीटी च्या माध्यमातून तुषार सिंचन,ठिबक सिंचन अशा सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले होते.आणि अशा अर्ज केलेल्या आणि अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान मिळणार आहे.

कोणती योजना राबवली जाते? Drip Irrigation Subsidy Scheme :-

आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनाचे अनुदान मिळावे,म्हणून पंतप्रधान सुक्ष्म सिंचन योजना राबवली जाते.आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना पूरक लाभ मिळत नसल्यामुळे.या सूक्ष्म सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा.म्हणून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबवली जाते.जी 2019 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे.

नेमकं किती टक्के अनुदान? Drip Irrigation Subsidy Scheme :-

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जेव्हा शेतकरी महा-डीबीटी पोर्टल अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करतात. आणि आपण केलेल्या अर्जाला जेव्हा पूर्व संमती मिळाल्यानंतर याच्यामध्ये फक्त 55 टक्के सबसिडी दाखवली जाते.याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला होता.की सबसिडी ही नक्की 55% आहे?की 80% आहे? याचबरोबर कृषी सहाय्यकाच्या आणि दुकानदाराच्या माध्यमातून दिली जाणारी सबसिडी 55% दिली जाते. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यामुळे बरेच सारे शेतकरी या योजनेपासून दूर जात होते.परंतु शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर प्रधानमंत्री सूक्ष्मसिंचन योजने बरोबरच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते.

ज्या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25% पूरक अनुदान आणि याचबरोबर बहुभुधारक शेतकऱ्यांना 30% अनुदान हे पाच हेक्टर पर्यंत या ठिकाणी मर्यादेमध्ये दिलं जातं. आणि याच योजनेकरीता आता दि.6 जानेवारी 2022 रोजी 200 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासंबंधातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.हा सदरील शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या ऑफिसियल वेबसाईटवर पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो आत्ताच आपण जाणून घेतलं की सूक्ष्म सिंचनासाठी किती टक्के अनुदान दिलं जातं,याचा निधी किती मंजूर झालेला आहे,पात्रता काय असणार आहे.आणि आपण पाहिलं तर काय महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता आणि ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी अशा करतो Drip Irrigation Subsidy Scheme. धन्यवाद.....!


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने