Mahadbt Yojana Anudan : कृषी यांत्रिकीकरण योजना या शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर अनुदान; शासनाचा जीआर जाहीर

 

Mahadbt Yojana Anudan : नमस्कार शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर कृषी औजाराच्या अनुदानासाठी महाडीबीटी वर अर्ज केलेल्या,पात्र झालेल्या आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी याचबरोबर या अनुदानासाठी नवीन अर्ज करू इच्छीत आहेत.अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक शासन निर्णय 24 नोव्हेंबर 20210रोजी घेण्यात आला आहे.त्याच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत.

का हे अनुदान दिलं जातं?

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सुमारे 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक,अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत. आणि आपण जर पाहिले तर शेती करण्यासाठी यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनलेली आहे.आपण जर पाहिलं तर क्षेत्र कमी असल्यामुळे,उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी या ठिकाणी ट्रॅक्टर सहा इतर कृषी अवजारे आहेत ते या ठिकाणी खरेदी करू शकत नाही. आणि याच्यासाठी आपण जर पाहिले तर शासनाच्या माध्यमातून सर्वच कृषी औजारवरती,ट्रॅक्टर वरती या ठिकाणी 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जात.

शेतकरी बंधूंना आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजना,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान इत्यादी.योजनेच्या अंतर्गत कशाप्रकारे कृषी औजारांच्या खरेदीसाठी, ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी,पावर ट्रेलरच्या खरेदीसाठी अनुदान दिले जातात.मात्र आपण जर पाहिले तर राज्यातील असलेले शेतकऱ्यांची उपलब्धता असणारा निधी याचप्रमाणे शेतकऱ्यांची असणारी मागणी हे सर्व लक्षात घेता वंचित शेतकरी राहू नयेत. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे Mahadbt Yojana Anudan.

त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कृषी औजारावरती अनुदान दिले जात.याचप्रमाणे ट्रॅक्टर साठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी sc/st शेतकरी,याचप्रमाणे महिला शेतकरी यांना ट्रॅक्टर साठी 50% जास्तीत जास्त १.२५ लाख रुपये अनुदान या ठिकाणी दिला जाते.मित्रांनो या योजनेकरिता 2021-22 करिता हा एक महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे.शासन निर्णयात 2021-22 वर्षांमध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी केली. ती अंबलबजावनी करण्यासाठी व रु.75 कोटी एवढा निधी आयुक्त(कृषी) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS) वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात येत आहे Mahadbt Yojana Anudan.

कोण आहे यास पात्र?

मित्रानो सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती-जमाती,महिला,अत्यल्प-अल्पभूधारक शेतकरी आहेत.यांच्यासाठी किमतीच्या 50% किंवा १.२५ लाख यापैकी कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा 1 लाख यापैकी कमी असेल,तर ते अनुदान याठिकाणी देण्यात यावे.याचप्रमाणे या योजनेचे अंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया ही पूर्णपणे महाडीबीटी पोर्टल द्वारे करण्यात यावी. अशा प्रकारचे जुन्या शासन निर्णय मध्ये देण्यात आलेले आहेत.

अशा काही महत्त्वपूर्ण बाबी Mahadbt Yojana Anudan :-

त्याचप्रमाणे आपण जर पाहिले तर योजनेची अंमलबजावणी करत असताना या निधीचे वितरण करत असताना 12 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीची काटेकोरपणे पालन करण्यात यावी. यासाठी लागणारी कागदपत्रे,नियम पूर्णपणे त्या शासन निर्णयानुसार असलेले वापर करा.अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन निर्णय देण्यात आलेले आहेत.अशा प्रकारचा शासन निर्णय घेतला आहे.यात रु.75 कोटी एवढा निधी 2021-22 मध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत,ज्यांची लॉटरी लागली आहे.

अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात येईल.याचबरोबर याच्या माध्यमातून जे लक्षांक निश्चित केले जातील.याच्यामधून नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे.तर अशा प्रकारची योजना, याच्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी अशा करतो, धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने