Ramai awas yojana |
नमस्कार शेतकरी मित्रांनो,रमाई आवास योजना 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता नवीन 1 लाख 36 हजार लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे आणि बंधुंनो हीच घरकुल कोणत्या विभागासाठी किती असतील त्याचप्रमाणे कशाप्रकारे दिली जातील यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण जाणून घेणार आहोत.
◾ योजनेअंतर्गत मिळतो लाभ?
शेतकरी मित्रांनो आपण जर एकंदरीत पाहिलं तर राज्यांमध्ये जी घरकुलांची कामे आहेत.ही गुणवत्तापूर्वक व्हावी,याचा पूर्ण लाभ नागरिकांना मिळावा,या कामात गतीमानता यावी यासाठी महाआवास अभियान-२ या ठिकाणी राबवला जात आहे. ज्याच्या मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत(Pm awas yojana)याच बरोबर या राज्याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पारदी आवास योजना असेल,शबरी आवास योजना असेल,रमाई आवास योजना आहे. किंवा यशवंत घरकुल योजना असेल.
असे विविध प्रकारची सुद्धा अंमलबजावणी प्रभावीपणे करून या ठिकाणी लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी एक अभियान राबविले जात आहे.
◾कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार लाभ?
मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकंदरीत या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त घरकुल देण्याचा शासनाच्या माध्यमातून एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. एक निर्धार करण्यात आलेला आहे.त्याच्यामध्ये यापूर्वी आपण पाहिलं होतं की शबरी आवास योजना ज्यामध्ये १५ हजार २४० घरकुल या ठिकाणी दिली जाणार आहेत.
मित्रांनो याच बरोबर आपण जर पाहिलं तर राज्यांमध्ये अनुसूचित जाती नवबौद्ध बांधवांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे रमाई आवास योजना आणि शेतकरी मित्रांनो याची आवास योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागासाठी १ लाख १३ हजार ५७१ त्याचप्रमाणे शहरी भागासाठी २२ हजार ६७६ अशी घरकुल देण्यासाठी 2021-22 करता या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे.
◾विभागानुसार मान्यता मिळालेली आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:-
विभाग घरकुल आकडेवारी
(ग्रामीण) (शहरी)
१) मराठवाडा-औरंगाबाद ३०११६ ७५६५
२) लातूर-विभाग २४२७४ २७७०
३) नागपूर-विभाग ११६७७ २९८७
४) अमरावती-विभाग २१९७८ ३२१०
५) पुणे-विभाग ८७२० ५७९२
६) नाशिक-विभाग १४८६४ ३४६
७) मुंबई-विभाग १९४२ ८६
अशा प्रकारे राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत २०२१-२२ या वर्षासाठी विभागानुसार घरकुल देण्यात येणार आहेत.
◾असा करा अर्ज:-
बंधूनी आपण याठिकाणी या योजनेचा अर्ज कसा करावा, कसा अर्जाचा नमुना आहे ते पाहू.अर्जाचा नमुना प्रत्येक नगरपालिका,महानगरपालिका किंवा जिल्हा विकास व ग्रामीण विकास यंत्रणा असतील त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केले जातात.त्यांच्या वेबसाईटवरती किंवा त्या ठिकाणी आपण आपले ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून घेऊ शकता.
▪️रमाई आवास योजनेच्या अर्जाचा नमुना:-
▪️ही कागदपत्रे असणे आवश्यक:-
१) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या अर्जदाराचा जातीचा दाखला.
२) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला.
३) जन्माचा दाखला किंवा जन्मतारीखीचा नोंद असलेला शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे.
४) रेशन कार्ड बीपीएल (पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स)
५) सध्याच्या घरकुलाचा कुटुंबप्रमुख व कुटुंबियासह रंगीत फोटो.
६) घर बांधणार आहे ती जागा स्वमालकीची असल्याबाबत नमुना नं.8 उतारा किंवा मालमत्ता नोंदणी पत्र पी.आर. कार्ड/नाही.
७) वीजबिल,निवडणूक ओळखपत्र किंवा शासकीय योजनेअंतर्गत मिळालेले ओळखपत्र.
हे ही पाहू शकता, ढोबळी मिरची शेती-अत्याधुनिक पद्धतीने करा,आणि मिळवा लाखोंचा फायदा
८) महानगरपालिकेची मालमत्ता कर भरल्याची पावती. (शहरीसाठी).
९) दारिद्र रेषेखालील कुटुंबामध्ये नाव समाविष्ट असल्याचे प्रमाणपत्र (जर असेल तर)
१०) बँक पासबुक इ.
अशा सर्व प्रकारची कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.
शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं रमाई आवास योजना अंतर्गत किती घरकुल मिळणार आहेत,या योजनेचा कसा लाभ घेऊ शकता कसा अर्ज करू शकता.ही माहिती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल अशी अशा करतो.