Mahadbt Sinchan Yojana : मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजने अंतर्गत शेततळे,ठिबक,तुषार सिंचन,पाईप्स; असा करा अर्ज

Mukyamantri shasvat sinchan yojana


Mahadbt Sinchan Yojana : नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ही योजना पूर्ण महाराष्ट्र मध्ये राबविण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे.आणि हीच माहिती
आपण घेणार आहोत.

अशी सुरू करण्यात आली होती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना:-

बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो,की ठिबक साठी तुषार सिंचन साठी पद्धतीने अर्ज कसा करावा? याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊया की, ठिबक सिंचन तुषार सिंचन या सर्वांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा!याच्या बद्दल माहिती जाणून घेऊया.
आपण जर पाहिले तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही महाराष्ट्रात राबवली जाते.याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के आणि भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचे अतिरिक्त महाराष्ट्रातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांनी तीन नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी 2019 मध्ये योजना सुरू करण्यात आलेली आहे Mahadbt Sinchan Yojana.

मुख्यमंत्री या योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि बहुधा रक शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते. ज्यामुळे महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यातील 251 तालुक्यातील शेतकऱ्यांना अल्प भूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के आणि बहुधा शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान मिळते.
मात्र आपण जर पाहिलं तर इतर जिल्हे आहेत किंवा इतर जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात नव्हती त्यामुळे त्या लाभार्थ्यांना 55 टक्के आणि 25 टक्के पर्यंत जाणाऱ्या मिळत होते.मित्रांनो ही योजना पूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची घोषणा करण्यात आलेले आहे.

हे बदल करण्यात आलेले आहेत Mahadbt Sinchan Yojana:-

याच प्रकारे आपण जर पाहिले तर केंद्र शासनाच्या योजना राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत. ज्याच्या मध्ये अनुदान दिले जाते.या अनुदानामध्ये सुद्धा काही वाढ करण्यात आली आहे.ज्याच्या मध्ये ठिबकसाठी  हेक्टरी अनुदान दिलं होतं.याच्यामध्ये मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजने अंतर्गत 13 टक्क्याची वाढ करण्यात आलेले आहे. याचप्रमाणे जे काही अंतराचे नियम आहेत हे नियम देखील काही प्रमाणात बदलण्यात आलेले आहेत.त्याचप्रमाणे आता वीस गुंठे यांचे जे क्षेत्र असणारे शेतकरी आहेत.त्यांना सुद्धा स्टिक ठिबक सिंचनाचा तुषार सिंचनाचा या ठिकाणी अर्धा एकर पर्यंत म्हणजे 20 गुंठे पर्यंत लाभ घेता येणार आहे.

असा भरू शकता अर्ज:-

महा-डीबीटी च्या वेबसाईटवर भेट जाऊन तुम्ही अशा खालील प्रकारे तुमचा अर्ज करून लाभ घेऊ शकता तेथे आपले रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे

पहिलं स्टेप म्हणजे तुम्हाला तेथे आपल्या पिकाचा तपशील द्यायचा आहे.हा तपशील देताना तुम्हाला खालील बाबी अबी घटक माहित असणे गरजेचे आहे. बाबी:- पीक निवडणे,पिकाचे अंतर(तुम्हाला किती अंतरावर पीक लावायचे आहे ते इथे टाकू शकता), मुख्य घटक(सिंचन साधने व सुविधा निवडणे.),उपघटक(ऑनलाईन निवडणे),जमिनीचा गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र इ.

यात तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता:-

  • ठिबक सिंचन
  • पाइप्स
  • तुषार सिंचन
  • पंपसेट/इंजिन/मोटार
  • वैयक्तीक शेततळे
  • शेततळे अस्तर(प्लास्टिक)
  • त्यानंतर जतन केल्यानंतर ते तुम्हाला दुसरा घटक हवा आहे का असे विचारते,जर पाहिजे असेल तर yes करून ही प्रोसेस पुन्हा करून अर्ज करू शकता.

जर पाइप ची निवड केली तर,पाइप आपणास २५० मीटर पर्यंत लांबीचे पाइप ची लांबी टाकू शकता.

सिंचन साधने व सुविधा यामध्ये जतर करा वर क्लिक केल्यावर जाते ज्यामध्ये जाऊन बाबी निवडा वर क्लिक करा.हे सर्व भरून झाल्यानंतर अर्ज सादर करा या बटण वर क्लिक करा. यानंतर आपल्या लाभ घेतलेल्या किंवा अर्ज केलेल्या योजनांचा क्रम लावणे. यानंतर सर्व भरलेल्या अर्जाची छाननी करू शकता. यानंतर ऑनलाईन पेमेंट करणे.

जेव्हा आपण कोणत्याही योजनेसाठी पात्र ठरलेले असाल तेव्हा winner म्हणून मेसेज येतो.त्यानंतर बाकी कागदपत्रे अपलोड करू शकता. त्यानंतर आपल्याला पूर्वसंमती आल्यानंतर पुढील कागदपत्रे अपलोड करू शकता.

शेतकरी मित्रांनो आज आपण पाहिलं की आपण तुम्ही मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजनेचा लाभ कसा घेऊ शकता,कसा ऑनलाईन अर्ज करू शकता.याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल Mahadbt Sinchan Yojana.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने