|Rojagar hami yojana 2021|रोजगार हमी योजना|महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक व मोठा निर्णय

Rajya rojagar hami yojana

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य रोजगार हमी योजनेच्या संदर्भातील असा एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा शासन निर्णय १८ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आला आहे.या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ मिळणार आहे.आणि याचा काय फायदा होणार आहे. हा शासन निर्णय आपण सगळ्यात कसा दिलासादायक ठरणार आहे. ही पूर्ण माहिती आपण माहीत करून घेणार आहोत.

◼️काय होणार नागरिकांना लाभ?

शेतकऱ्यांना आपण पाहिलं तर राज्य रोजगार हमीच्या(Rojagar hami yojana)माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारची योजना(shetkari yojana) दिल्या जातात. ज्याच्या मध्ये आपण जर पाहिलं तर शेळी पालन शेड असेल, गायगोठा असेल,विहिरीच्या योजना असतील, फळबागाची योजना असतील किंवा नानाप्रकारची या ठिकाणी कामे दिली जातात.
मात्र आपण जर पाहिलं तर काही गाव लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मोठे असतात.

ती कालांतराने या ठिकाणी नगरपंचायत नगरपरिषद या मध्ये रुपांतरीत होतात. आणि याच्या नंतर या गावांना राज्य रोजगार हमी योजनेचा लाभ मिळत नव्हता आणि मित्रांनो याच्यासाठी आपण पाहिलं की 2013 मध्ये असा एक शासन निर्णय घेऊन 2013 च्या या 'क' वर्गाच्या नगरपंचायत आहेत, नगरपरिषद आहेत त्यांना देखील या राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे देण्यासाठी मंजूर देण्यात आलेली होती. मात्र ही मंजुरी देत असताना आपण जर पाहिलं तर जो मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला होता.

◼️या नागरिकांना मिळणार लाभ:-

जो शासनाचा निर्णय आलेला होता.
याच्यामध्ये कुशल आणि अकुशल जे काही 60:40 च प्रमाण राखण्यासाठी कुशलचे एकूण 40% मधून 25% हे नगर परिषदच्या स्वानिधिमधून याठिकाणी खर्च करण्यात यावा अशा प्रकारची एक सूचना,एक अट त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली होती.
मात्र आपण जर पाहिले तर 2014 पासून आता 2021 पर्यंत सहा-सात वर्षांचा कालावधी गेला मात्र अद्याप सुद्धा आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना या निधीमधून जे काही 25% च प्रमाण देणे अपेक्षित आहे.ते दिले जात नाही ती पर्यायी योजना राबवल्या जात नाहीत.आणि या नगर परिषदांमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मनस्ताप होतो,योजनांचा लाभ मिळत नाही.अशा प्रकारचे 'क' वर्गाच्या नगरपंचायत नगरपरिषद मध्ये गेलेल्या आणि या योजनेची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या ऑफिसियल वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे.हा तुम्ही वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करू शकता.हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे.या वरील सर्व बाबींचा विचार करून हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे.

◼️शासन परिपत्रक:-

महाराष्ट्र रोजगार हमी कायदा 1977 नुसार शासन निर्णय दिनांक 3 मार्च 2014 रोजी राज्यातील 'क' वर्ग नगरपरिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेच्या परिणामकारक अशा अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे:-
◾राज्यातील सर्व 'क'वर्ग नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात रोजगार हमी योजना अंतर्गत कामे करताना कुशल कामावर करावयाच्या खर्चापैकी 25 टक्के रक्कम संबंधित क वर्ग नगरपरिषद किंवा नगरपंचायती यांनी त्यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करावा.
◾ याबाबतच्या कार्यवाहीवर आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत सनियंत्रण करावे.

या योजनेचा घ्या लाभ,ट्रॅक्टर अनुदान योजना पहा कसा भरणार अर्ज ऑनलाईन 

शेतकरी मित्रांनो,तर अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतल्यामुळे आता या कुशल 40% मधून 25 टक्के निधी आहे.तो स्वनिधीमधून ठिकाणी नगर परिषद किंवा नगरपंचायत त्यांना द्यावा लागणार आहे जेणेकरून योजनेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र नक्की दिलासा मिळणार आहे.मित्रांनो आपण जर पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याला योजनांची गरज असते.मग ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो.
                                   मात्र मिळणाऱ्या योजना असा या ठिकाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना या शासन निर्णयाच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण जाणून घेतला तर चला भेटू या नव्या योजना अपडेट सोबत धन्यवाद........!


येथे पहा असा काढा घरबसल्या सातबारा,१९८० पासूनचे उतारे,असे करा आपल्या मोबाईलवर डाऊनलोड


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने