PM Kisan E-Kyc |
मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेत 2021 मध्ये मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केलाआहे.शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यासच त्यांना पुढील हप्ता मिळेल.त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही. सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यां- साठी आणि पात्र शेतकऱ्यांसाठी आधार E-KYC करणे अनिवार्य केले आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी, खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार अनुसरण करून करू शकता.
ई-केवायसी कसे पूर्ण करावे?
- पीएम किसानच्या ऑफिसियल वेबसाइटवर जा.
- उजव्या बाजूला, Farmers Corner पर्याय शोधा.
- तिथे तुम्हाला eKYC लिंक मिळेल. लिंक वर क्लिक करा. आता तुमचा आधारचा नंबर आणि तेथील इमेजचा सेक्युरीटी कोड टाका आणि सर्च बटनवर क्लिक करा.
- यानंतर तुमचा आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका.
पंतप्रधान किसान शेतकऱ्यांसाठी संदेश PM Kisan Adhar E-KYC :-
पीएम किसान योजना या योजने च्या अंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी eKYC करणे १० व्या हप्त्यासाठी अनिवार्य असल्याचे सरकार मार्फत नवीन ऑप्शन टाकण्यात आलेला आहे. त्यात जोडले आहे की आधार आधारित OTP प्रमाणीकरण करण्यासाठी वेबसाईटवर दिलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधून करू शकता. तुम्ही हे तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरद्वारे घरी बसूनही करू शकता.
अद्ययावत लाभार्थी स्थिती आणि यादी तपासा PM Kisan Adhar E-KYC :-
याशिवाय, शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जाची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी पीएम किसान लाभार्थी स्थिती आणि यादी देखील तपासली पाहिजे. यासाठी, तुम्हाला शासनाच्या ऑफिसियल वेबसाइटवर जावे लागेल,आणि तपशील जाणून घेण्यासाठी लाभार्थी स्थिती(Pm kisan Benefitiary status असा पर्याय) किंवा लाभार्थी यादीवर क्लिक करून देखील तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता.
तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की काही शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर शासनाने पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या १० व्या हप्त्यासाठी शासनाने काही महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला होता.आणि तो म्हणजे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना १० व्या हप्त्यासाठी E-Kyc करणे अनिवार्य केले होते.आणि ती कशी करायची?कोठे करायची हे आपण पाहिले आहे.तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी अशा करतो PM Kisan Adhar E-KYC.