केंद्र शासनाचा घरकुल योजनेबाबत मोठा निर्णय | प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

PM Awas Yojana-Gramin

pm awas yojana gramin 2021 : नमस्कार शेतकरी मित्रांनो,शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकरी जे घरकुलाच्या(Gharkul) प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे.तर आता आपण पाहणार आहोत की,घरकुलासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.ही सर्व माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजना (PMAY-G) ही योजना मार्च 2021 च्या पुढे मार्च 2024 पर्यंत राबवण्यासाठी वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने मंजूर करण्यात आलेली आहे.

घरकुल होणार का मंजूर? pm awas yojana gramin 2021 :-

मित्रांनो आपण जर पाहिले तर ग्रामीण भागातील घरकुलांचे स्वप्न पूर्ण व्हावे.प्रत्येक नागरिकाला आपले हक्काचे घर मिळावे.यासाठी आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजना सुरू करण्यात आलेली होती योजनेअंतर्गत मार 2022 पर्यंत जवळजवळ 2.95 कोटी घर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. मात्र आपण जर पाहिलं तर या उद्दिष्ट पैकी 1.65 कोटी घर या ठिकाणी पूर्ण करण्यात आली होती आणि आता या योजनेचा कालावधी मार्च 2022 पर्यंत असल्यामुळे पुढे या योजनेचे काय होणार. 

योजना बंद होणार का उर्वरित लाभार्थ्यांना मिळणार का अशा प्रकारचे एक चिन्ह याठिकाणी निर्माण झालेली होतं आणि याच पार्श्वभूमीवर ती ही योजना 2024 पर्यंत पुढे चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. आता जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना आता प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळेल अशा प्रकारे स्वप्न पूर्ण होणार अशा प्रकारची एक शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे.

किती निधी झाला मंजूर?

मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये दिलेली जी काही मंजुरी आहे. 2.95 कोटीच्या घरांच्या एकत्रित उद्दिष्ट पैकी उर्वरित ठिकाणी घरे आहेत.याच्या बांधकामाकरिता याठिकाणी 2024 पर्यंत ही योजना पुढे सुरु ठेवण्यासाठी मंजुरी(pm awas yojana gramin 2021) देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण(PMAY-G 2021)अंतर्गत 295 कोटी घरांचे एकत्रित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उर्वरित 155.75 लाख घरांच्या बांधकामासाठी एकूण 2 लाख 17 हजार 257 कोटी रुपये खर्च(Gharkul Yojana Nidhi) येणार आहे.(याच्यात केंद्राचा वाटा 1 लाख 25 हजार 106 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा 73 हजार 475 कोटी रुपये अशाप्रकारे आहे.) 

आणि याच प्रमाणे नाबार्डला व्याज परतफेड करण्यासाठी 18 हजार 676 कोटी रुपयांची अतिरिक्त आवश्यकता आहे. याचप्रमाणे 29 नोव्हेंबर 2021 पर्यंत एकूण 2.95 कोटी घरांची जी काही उदिष्ट आहे.यापैकी 1.65 कोटी घरे बांधण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांसाठी यामुळे ही योजना फायदेशीर ठरणार आहे.

शेतकरी मित्रांनो 2.02 कोटी घरे याठिकाणी एसइसीसी (SECC 2011) २०११ च्या डेटाबेस नुसार या ठिकाणी प्रतीक्षायादी च्या जवळ आहेत. त्यांचे बांधकाम 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होईल. अशा प्रकारची सुद्धा एक शक्यता याठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि या योजनेच्या पुढील कामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानी या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे ज्या मंजुरीमुळे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे घरकुलाचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ग्रामीण भागातील घरकुलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट होतं आणि ही माहिती आपणास नक्की उपयोगी ठरेल अशी आशा करतो, धन्यवाद pm awas yojana gramin 2021.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने