Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Anudan Anudan Yojana 2021 : नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपण आता जाणून घेणार आहोत अशा एका महत्त्वपूर्ण अनुदान योजनाचे अपडेट आणि ती योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेविषयी शेतकऱ्यांना आता दिलासा देणारा असा शासन निर्णय आपण जाणून घेणार आहोत.
कोणाला या योजनेचे अनुदान दिले जाते?
शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर प्रत्येक शेतकरी हा चांगली शेती करणे असो उद्योग करण्यासाठी भांडवल पुरेपूर असणारा नसतो आणि असेच शेतकऱ्यांला शेतीत फळबाग लागवड योजनेकरीता पात्र होत नाहीत.अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या 100% अनुदानामुळे (Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Anudan Anudan Yojana 2021) मदत होते.
काय आहे ही योजना?
मित्रांनो जे शेतकरी फळबाग लागवड योजनेकरीता पात्र होत नाहीत अशा शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेकरीता अनुदान देण्याकरिता राज्यशासनाच्या माध्यमातून २०१८ मध्ये स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना याठिकाणी सुरू करण्यात आली होती.ज्या योजनेमध्ये पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या या तिन्ही वर्षांचं मिळून १००% अनुदान दिलं जातं.शेतकरी मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत आपण.
जर पाहिलं तर २०१८-१९ त्याचप्रमाणे २०१९-२० या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी फळबागाची लागवड केलेली आहे.त्यांच्या पहिल्या,दुसऱ्या अनुदानाची अद्याप देखील बाकी होती. आपण याचप्रमाणे पाहिलं तर २०२०-२१ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली आहे.त्यांचे पहिले हप्ते अद्याप देखील वितरित झाली नव्हती.याच सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती.ती प्रतीक्षा या अनुदानाची होती. शेतकरी मित्रांनो याच अनुदानाकरिता एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय ६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आला आहे.तर आपण तो जाणून घेऊया नक्की काय आहे शासन निर्णय.
काय आहे शासन निर्णय?
शेतकरी मित्रांनो या शासनाच्या निर्णयामध्ये २०२१-२२ या वर्षामध्ये स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना करिता १०० कोटी रुपयांचा एवढा निधी तरतूद करण्यात आला आहे.आणि ज्याच्यापैकी ३६.५३ कोटी रुपये एवढा मंजूर करण्यासाठी राज्य शासनाने निर्णय(Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Anudan Anudan Yojana 2021) काढून यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या असून याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेल्या ३७.५३ कोटी निधी याठिकाणी वितरणासाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कृषी आयुक्त,महाराष्ट्र राज्य यांना या ठिकाणी अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.
याचप्रमाणे चालुवर्षी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला हा निधी २०१८-१९ व १०१९-२० या वर्षातील प्रलंबित दायित्वाचा अदागयीसाधी प्राधान्याने वापरण्यात यावा. अशा प्रकारच्या सूचना देखील या निर्णयात देण्यात आलेल्या आहेत.तर शेतकरी मित्रांनो अशाप्रकारच्या या ३७.५३ कोटी निधीमुळे याठिकाणी २०१८-१९ मधील शेतकऱ्यांचा तिसरा हप्ता,२०१९-२० मधील शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता याचप्रमाणे २०२०-२१ मधील शेतकऱ्यांचा पहिला हप्ता अशाप्रकारचे हे हप्ते वितरणासाठी हा निधी आता या ठिकाणी वापरला जाणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय होता.कारण गेल्या दोन वर्षापासून शेतकरी या योजनेच्या अंतर्गत निधीच्या वितरणासाठी अद्याप देखील प्रतीक्षेत आहेत.आणि त्यांच्यासाठी हा निधी याठिकाणी वापरला जाऊ शकतो. तर अशाप्रकारे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या या निधीच्या संदर्भातील हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं,माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी अशा करतो, धन्यवाद Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Anudan Anudan Yojana 2021.