PoCRA Yojana Update |
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत वेगवेगळ्या बाबींचे अनुदान हे दिले जाते.आणि हे अनुदान देण्यासाठी अनेक अशा योजना या राबवल्या जातात. आणि आता आपण अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारी पोकरा या योजनेच्या अंतर्गत घेतलेला एक महत्त्वपूर्ण असा निर्णय,एक अपडेट(pocra yojana update) जाणून घेणार आहोत.
POCRA Yojana Update आता शेतकऱ्यांना पोकराच्या अंतर्गत मिळणार या योजनांचा लाभ ; येथे पहा पूर्ण माहिती
पोकरा योजनेची सद्यस्थिती:-
PoCRA Yojana : शेतकरी मित्रांनो महाडीबीटीवर साधारणपणे 2020 मध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यानंतर वेगवेगळ्या योजनांचे अर्ज भरणे सुरू झाले.आपण पाहिलं तर जी काही पोकरा ची गावे आहेत.या अशा सर्व गावांसाठी या पोकरा च्या प्रत्येक योजना या सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु लक्षांक कमी आणि लाभार्थी जास्त अशी स्थिती निर्माण झाली होती.
पोकराच्या अंतर्गत असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा महा-डीबीटी वर या योजनेचे अर्ज पाइपलाइन असो,ठिबक असो,तुषार असो, ट्रॅक्टर असो, ट्रॅक्टरची औजारे असो अशा वेगवेगळ्या बाबींसाठी भरले होते.आणि अर्ज भरून या योजनांची लॉटरी लागून लाभार्थ्यांना एसएमएस आले होते.कागदपत्रांचे ऑप्शन आले होते.आणि पूर्वसंमती पण मिळाली होती.
आणि ही पुर्वसंमती आल्यानंतर याचे अर्ज हे होल्ड करण्यात आले होते.की पोकरा च्या अंतर्गत असणाऱ्या गावाला महा-डीबीटी वरच्या ज्या काही योजना आहेत.किंवा ज्या काही कृषी विभागाच्या माध्यमातून योजना(mahadbt scheme) राबवल्या जातात.या योजनाचा लाभ दिला जाणार नाही.
अशाप्रकारे अंबलबजावणी करण्यात आली:-
शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर शेतकऱ्यांनी एक छोटीसी म्हणून किंवा जिथे शक्य होईल तिथे आवाज उठवून दाद मागायला सुरुवात केली होती आणि बऱ्याच साऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठिंब्याने,आणि जे काही शेतकरी नेते आहेत यांच्या माध्यमातून हा आवाज मोठा केला गेला.आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की, कृषिमंत्र्यांना वेळोवेळी या बाबीची जाणीव करून देण्यात आलेली होती.
ज्या वेळेस पोकरा जिल्हास्तरीय आढावे होते.या आढावा बैठकीत सुद्धा दादाजी भुसे यांना याच्या संदर्भात कल्पना करून देण्यात आलेली होती. शेतकरी मित्रांनो याच्यानंतर साधारणपणे सप्टेंबर 2020 मध्ये संचालकाच्या याच्या संदर्भातील परिपत्रक काढले जाईल.आणि लाभार्थ्यांना याच्यासाठी पात्र केले जाईल.अशी प्रकारची सप्टेंबर 2020 मध्ये शक्यता होती.
ही बातमी पण वाचा : आता आपण मोबाईलवर पाहू शकता आपल्या जमिनीचा शासकीय बाजारभाव
परंतु सप्टेंबर 2020 गेला आणि सप्टेंबर 2020 पण आला.
परंतु तरीपण पोपटाचे अंतर्गत असणाऱ्या गावांना महाडीबीटी च्या योजनांचा लाभ दिला जात नव्हता. आणि शेतकरी मित्रांनो याच्यासाठी नोव्हेंबरमध्ये एक बैठक पार पडली होती.या बैठकीच्या वेळेस जे काही अर्ज लक्षांकापेक्षा जास्तप्रमानात झाल्यामुळे कृषी यांत्रिकीकरण किंवा पाइपलाइन वगैरे वगैरे चे अर्ज(pocra yojana update) भरता येत नाहीत.
लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत.ही बाब पुन्हा एकदा निदर्शनास आणली गेली.आणि याच अनुषंगाने 14 जानेवारी 2022 रोजी एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
येथे शासनाचा जीआर पहा-येथे पहा
कोणत्या बाबींसाठी अर्ज होणार सुरू:-
शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहिलं तर महाडीबीटी च्या अंतर्गत ज्या सर्व काही योजना राबविल्या जातात. त्याच्यामध्ये आपण पाहिले तर फक्त औजार बँकेची स्थापना ही बाब सोडून सर्वच्या सर्व योजनांचे लाभ हे पोकराच्या अंतर्गत असणाऱ्या गावांना दिले जाणार आहेत. तशाप्रकारचा जीआर,तशा प्रकारचे परिपत्रक(pocra yojana update) हे काढण्यात आलेले आहे.
हे परिपत्रक पोकराच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेले आहे.त्याला आता प्रसिद्धी दिली जाईल.
या बाबींच्या अनुदानासाठी करू शकणार पात्र शेतकरी अर्ज(MahaDBT Subsidy Scheme):-
- ट्रॅक्टर औजारे बँकेची स्थापना सोडून बाकी सर्व बाबींसाठी आता पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार
- फळबाग लागवड अनुदान योजना
- पाइपलाइन अनुदान योजना
- ठिबक अनुदान योजना
- तुषार सिंचन अनुदान योजना
- ट्रॅक्टर अनुदान योजना इ.
हेच शेतकरी पात्र असणार
ज्या कोणी लाभार्थ्यांनी अर्ज केलेले असतील आणि त्यांना पूर्वसंमती मिळालेले असेल.आणि त्या लाभार्थ्यांना पोकरा च्या माध्यमातून लाभ मिळालेला नसेल.तू परंतु हेच लाभार्थी एखाद्या पूर्वसंमती मिळालेल्या बाबीसाठी अर्ज करीत.असतील तर त्यांना या योजनेतून बाद केले जाईल.त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ(pocra yojana update) मिळू शकणार नाही.
आणि ज्या लाभार्थ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी पाईपलाईनचा किंवा कृषी औजारांच्या लाभ घेतलेला नाही.आता अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.
येथे पहा ही माहिती : पीएम किसान ११ वा हप्ता ही कागदपत्रे आवश्यक
अशाप्रकारे अर्ज असणार उपलब्ध:-
शेतकरी मित्रांनो एक आनंदाचे अपडेट आणि बरेच शेतकरी हे या योजनेच्या अपडेटच्या प्रतीक्षेत होते. असे एक आता महत्वपूर्ण असे अपडेट आहे. कारण आता पोकराच्या अंतर्गत असणाऱ्या गावांसाठी सुद्धा या योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे.कारण पोकराच्या अंतर्गत कृषीयांत्रिकीकरण बंद आहे.आणि त्याची लॉटरी लागली आहे आणि ज्यां शेतकऱ्यांनी 2019 मध्ये अर्ज भरले होते.त्या शेतकऱ्यांची लॉटरी आता 2021 मध्ये लागलेली आहे.
आणि नवीन बाबी लक्षांक नसल्यामुळे भरलेल्या नाहीत.आणि पाइपलाइनची सुद्धा तीच स्थिती आहे.त्याचे अर्ज सुद्धा बंद आहेत. आणि त्याच्यामुळे शेतकरी मित्र तुम्ही महाडीबीटीवर अर्ज(pocra yojana update) करू शकता.
अर्ज करताना ही काळजी घ्यायची आहे.
फक्त काळजी कशी घ्यायची आहे?की,आपण पोकराच्या अंतर्गत किंवा महा-डीबीटी च्या अंतर्गत या दोन्हीपैकी एकाच ठिकाणी अर्ज करा. एकाच ठिकाणी या योजनांचा लाभ घ्या.जेणेकरून या योजनेची दुर्युक्ती होणार नाही आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.आणि तुमच्या गावाच्या ज्या याद्या त्या याद्या तालुकास्तरावर पाठवण्यात येतील. पोकराच्या अंतर्गत या योजनेसाठी लाभ घेतलेला आहेत.
येथे पहा या योजनांचे अर्ज सुरू-येथे पहा
त्यांचे नाव त्या तालुकास्तरावर असेल.जरी तुम्हाला पूर्वासंमती मिळालेली असेल.तर त्याची पूर्वसंमती बाद केली जाईल.
या योजनेसाठी आता अर्ज करू शकता:-
तर शेतकरी मित्रांनो आपण अद्याप देखील अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करू शकता.कारण बऱ्याच साऱ्या बाबी जसे की,पोकराच्या अंतर्गत असलेल्या गावात एससी/एसटी जे लाभार्थी आहेत. परंतु नवीन विहिरीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंबन,बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनेला तुम्ही आता अर्ज करू शकता. पाइपलाइन,ठिबकसाठी,फळबाग लागवड,कृषी औजारे आणि ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेसाठी अर्ज करू शकता.
तर शेतकरी मित्रांनो आताच आपण अतिशय महत्त्वाचे आणि आनंदायी अशे महत्त्वपूर्ण अपडेट होते ज्याच्या प्रतीक्षेत सर्वच शेतकरी होते आणि हे अपडेट आपणापर्यंत पोहचविणे हे देखील महत्त्वाचे होते आणि ही माहिती नक्की उपयोगी पडेल अशी अशा करतो.धन्यवाद.....!