Land Valuation : आपल्या जमिनीचा बाजारभाव करा चेक ; पहा येथे पूर्ण माहिती- SHETKARINEWS

Land Valuation
Land Valuation

Land Valuation : आपल्या जमिनीचा बाजारभाव करा चेक ; पहा येथे पूर्ण माहिती

Land Valuation : नमस्कार शेतकरी मित्रांनो,मित्रांनो किती आहे तुमच्या शेतीचा बाजार भाव?आपण पाहिलं तर आपण जमीन खरेदी-विक्री करताना काही वेळेस फसवणूक होते. आणि आपल्याला जमिनीचे नक्की बाजारभाव(Land valuation) माहित नसल्यामुळे आपले चांगलेच नुकसान होते.आणि आता आपण यामुळे एक महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत.

यामुळे आता आपण तुमचे जमिनीचा बाजारभाव ऑनलाईन कसा पाहायचा.आणि या बाजारभाव चे जे मूल्यांकन आहे ते कसे निश्चित केले जाते.याची संपूर्ण माहिती(Land valuation) आता आपण जाणून घेणार आहोत.

जमिनीचे भूसंपादन बाबी:-
Land Valuation In Maharashtra 2022

शेतकरी मित्रांनो मागील काही आठवड्यात शासनाचा जीआर आला होता.आणि त्या शासन निर्णयात जे काही राज्य हायवेच्या लगतच्या जमिनी आहेत,राज्य महामार्गाच्या लगतच्या ज्या जमिनी आहेत.या जमिनीचे भूसंपादन(Land valuation) करत असताना मोबदला निश्चित करण्याबाबतची जी कार्यपद्धती आहे.
त्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आलेले आहेत.त्याचे गुणक बदलण्यात आलेले आहेत.

जमिन बाजारभाव(Land valuation) मूल्यांकन:-

शेतकरी मित्रांनो,प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडतो की, आपल्या जमिनीचा बाजारभाव शासकीय बाजारभाव किती आहे? त्याचे मूल्यांकन कशे केले जाते?एकाच गावातील जमिनीचे दर हे वेग-वेगळे असू शकतात का?आपण पाहिलं तर जे जमिनीची खरेदी विक्री करत असताना जे बाजारमूल्य ग्राह्य धरलं जातं.ते सुधा हेच बाजारभाव(Land valuation) असतात.
याच बरोबर आपण पाहिलं तर, जमीन खरेदीसाठी राबवल्या जाणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना असेल.याचबरोबर आदिवासीची सबळीकरण स्वाभिमान योजना असेल.याच्या अंतर्गत जी काही जमीन अनुदाना मार्फत दिली जाते.या जमिनीच्या अनुदानाची मूल्यांकन सुद्धा याच जमिनीच्या बाजार भावानुसार केले जाते.

हे पण पहा : शेळीपालन व शेड साठी मिळणार ५० लाखापर्यंत अनुदान ; येथे करा अर्ज

याच्या मध्ये सुद्धा चे मूल्य ग्राह्य धरलं जातं ते सुद्धा हेच शासकीय मूल्य असते. त्याचप्रमाणे आपण जर पाहिले तर वेगळ्या बाबींच्या अंतर्गत,वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत जे जमिनीचे भूसंपादन केले जाते दिला जातो.हा मोबदला सुद्धा याच बाजारभावाच्या आधारे निश्चित केला जातो.
याच प्रमाणे आपण पाहिलं तर ज्या काही वर्ग-२ च्या ज्या काही जमिनी आहेत.

या जमिनी वर्ग-१ मध्ये करताना जो 75% नजराना भरायचाय किंवा 50% नजराना भरायचाय हा नजराना सुद्धा याच बाजारभावानुसार निश्चित केला जातो.आणि यामुळेच हे बाजारभाव माहित असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

शासकीय बाजारभावाचे उपयोग:-

  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना चा मोबदला निश्चित करताना याच बाजारभावाच उपयोग केला जातो.
  • आदिवासी तिच्या सबलीकरण स्वाभिमान योजना चा मोबदला निश्चित करताना
  • जमीन खरेदी-विक्रीसाठी
  • वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करताना

कसा पाहायचा बाजारभाव:-

आपल्याला आपल्या जमिनीचा बाजारभाव पाहायचा असेल तर खालीलप्रमाणे पाहू शकता:-

  1. आपल्याला बाजारभाव पाहण्यासाठी आयजीआर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  2. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे आपण पाहिलं तर महत्त्वाचे दुवे अंतर्गत मिळकत मूल्यांकन हे ऑप्शन देण्यात आलेले आहे.यावर क्लिक करा.
  3. यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग या वेबसाईटवर जाल.
  4. तेथे आपणास बाजारभाव दरपत्रकवर महाराष्ट्राचा नकाशा दाखवला जाईल.आणि याच नकाशावर आपल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करायचे आहे.
  5. यानंतर नवीन डॅशबोर्ड ओपन होईल तेथे आपला तालुका व गाव टाकून आपण आपल्या जमिनीचा शासकीय बाजारभाव(Land valuation) पाहू शकता.

महत्त्वाची सूचना :- या दरात आपल्याला आपल्या गावात वेगवेगळे दर दाखवले जातील हे दर आपल्याला असेसमेंट रेंज नुसार दाखले जाईल आणि हा दर आपण आपण आपल्या सातबाऱ्यावर आकारणी असा ऑप्शन असतो तेथे आपल्याला आपल्या जमिनीची असेसमेंट रेंज पाहायला मिळेल.

तर शेतकरी मित्रांनो आपण आत्ताच जाऊन घेतले की, आपण आपल्या जमिनीचा शासकीय बाजारभाव(Land valuation) कसा पाहू शकतो.त्याचे मूल्यांकन कसे केले जाते.आणि ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा करतो. धन्यवाद......!टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने