Coriander Farming : कोथिंबीर शेती अशी करा एकरी लाखोंचा फायदा

 

Coriander farming

Coriander Farming : नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण जाणून घेऊया की,कोथिंबीर हे पीक आपण थोड्या प्रमाणात घेतले जाते ते आता आपल्याला एकरी कसा चार ते पाच लाखांचा फायदा देऊ शकते.आज आपण जाणून घेऊया की कोथिंबीर पिकाची शेती कशी करावी, कसे त्यासाठी पूरक वातावरण गरजेचे आहे,कशी त्याची लागवड करायला हवी आहे.अशा सगळ्या गोष्टींच्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापनामुळे आपण कसे कोथिंबिरीचे उत्पादन हे आपण चांगल्या प्रकारे 35 ते 40 दिवसांत बाजारात विक्री जोगे घेऊ शकतो. आणि कशी त्याची विक्री करून आपण एकरी पस्तीस ते चाळीस दिवसांत दीड ते दोन लाखांचा फायदा करू शकतो.

अशा प्रकारे करू शकता शेती :-

हवामान : कोथिंबीर उत्पादनासाठी जास्त घोषणा अशा वातावरणाची गरज नसते. या उत्पादनासाठी कमी उष्ण वातावरणात चांगले उत्पादन प्राप्त करू शकतो तर या उत्पादनासाठी 20°C-30°C आणि जास्तीत जास्त 30°C पर्यंत तापमान आवश्यक असते.याचे पेक्षा जास्त तापमान असल्यास कोथिंबीर चांगल्या प्रकारे येत नाही,जर आपण हिवाळ्याच्या काळात करत असाल तर कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतो.जर आपला भाग उष्ण भागाच्या वातावरणात येत असेल, तर आपणास थोडा खर्च येऊ शकतो.जसे की आपण यांचे पीक पॉलिहाऊसमध्ये घेऊ शकता.या पिकासाठी अशी हवामानाची गरज असते Coriander Farming.

जमीन : कोथिंबीरीची पीक घेण्यासाठी आपण वरच्या वर पण या पिकाचे उत्पन्न घेऊ शकतो;पण चांगले आणि अधिक उत्पादनासाठी जमिनी मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन असावी. पाणी जास्त दिवस धरून ठेवणारी असावी.आणि मध्यम किंवा जास्त काळीची असेल तरी चालेल;परंतु जमिनीत सेंद्रिय खते जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही हलक्‍या किंवा भारी कसदार असलेल्या जमिनीत देखील कोथिंबीर लागवड करू शकता.

आपण जर पाहिलं तर आपल्या भारतात अनेक प्रकारच्या जमिनी आढळून येतात पण या कशासाठी मातीचा Ph हा सहा-आठ असावा लागतो. जर या पेक्षा जास्त असेल तर या पिकासाठी पूरक नसतो जर जमीन लाल मातीचे असेल,तर या मातीत आपले पीक चांगले येते.

यानंतर आपण चांगले लागवडीसाठी आपण जमिनीत एक ते दोन वेळेस नांगर हाणून नंतर आपण रोटर हाणून जमीन चांगल्याप्रकारे लेव्हल करणे महत्त्वाचे असते याने माती भुसभुशीत होते. व हवा खेळती राहते याने पीक चांगल्या प्रकारे येते. लेबल करणे यासाठी महत्त्वाचे आहे,कारण कोठे पाणी साचल्याने या पिकासाठी हानी होते हे पीक जास्त पाण्याने तेव्हाच लागते. तर अशी जमीन तुम्ही चांगल्या उत्पादनासाठी तुम्ही निवडू शकता.

पाण्याची आवश्यकता Coriander Farming:-

पाणी हा या पिकासाठी मुख्य घटक आहे.कारण या पिकासाठी पाण्याची पूरक प्रमाणात आवश्यक असतेच आणि जर अचानक तापमानात थोडा बदल झाला,तर पाणी पूरक असल्याने त्याचा पिकावर काहीही फरक पडत नाही.

अशी करावी लागवड लागवड:-

कोथिंबीर पिकाची लागवडी अनेक प्रकारे करतात परंतु वागून याची लागवड खालील दोन प्रकारे करू शकता

१) बेड पद्धतीचा वापर करून आपण याचे उत्पादन घेऊ शकता यात आपण ठिबक आणि फवारणी गण वापरून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. यात आपणास ब्रॉडकास्टिंग पेक्षा कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे उत्पादन घेता येते.कारण यात पिकातील अंतर सुटसुटीत आणि पाणी पुरक प्रमाणात पुरते आणि हवा खेळती राहून मुळांची वाढ झाल्याने रोग होण्याची शक्यता कमी होते.

२) आयताकार सऱ्या पाडून सुद्धा करता येते याचा आपण स्प्रे गन चा वापर करू शकतो.किंवा नाले पद्धतीने पाणी सोडणे,अशी शेती करू शकता.

तर अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीरीची लागवड करू शकतात.

कोथिंबिरीच्या या जातींची लागवड करू शकता:-

CO1,CO2,CS287,KARAN,COIMBATO-RE1,JALGAON,WAI इ.

खत आणि रोग व्यवस्थापन Coriander Farming:-

फर्टीकेशन म्हणजे खत व्यवस्थापनाची गरज जास्त प्रमाणात करण्याची गरज नसते.कारण ३५-४० दिवसांनी कोथिंबीर मार्केटमध्ये नेण्याजोगे होऊन जाते.कोणतीही NPK कोथिंबिरीची धने लावतानी वापर केला तरी चालेल.नंतर पंधरा दिवसानंतर तुम्ही १० किग्र. युरिया आपण एक एकर मध्ये ड्रिप ने दिला तरी चालतो आणि 15 ते 20 दिवसांनंतर २.५g/Lit. युरिया केला तरी काम होऊन जाते.आपण जर पाहिलं तर ड्रिप मधून आपली पार्टी होते आणि स्प्रे मधून पण दुसऱ्या वेळेस होते. इतके खत व्यवस्थापन खूप होते यासाठी जास्त खर्च करण्याची काही गरज भासत नाही.

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर या पिकासाठी कोणता मोठा रोग असा नाही यात थोडे छोटे-मोठे रोग येतात.जर आपण पाहिलं तर अफिड येतो.त्यासाठी आपण Dimethoate-30% EC चा वापर प्रतीलिटर 2 ml करू शकतो.आणि दुसरा रोग म्हणजे पावडरी मिल्डिव येतो.त्यासाठी आपण Dincop आणि sulphur वापरू शकतो.

Dincop चा वापर प्रतिएकर 200 ml करायचा आहे.आणि sulphur प्रतीलिटर 1-2g वापर करू शकतो.आणि आपण जर पाहिलं तर थोड्या प्रमाणात wilt दिसून येतो.त्यासाठी आपण Pseudomonas fluorescens चा वापर 1 एकरात 10kg पावडर फेकू शकतो.किंवा Tricoderma प्रती एकर 2 ली. च्या प्रमानात सोडलं तरी चालते.

भांडवल इतके मिळू शकते:-

आपण जर पाहिलं तर जून डिसेंबर पर्यंत यात आपण एकरी 12 ते 15 टनांपर्यंत उत्पादन निघते आणि आणि गर्मीचा काळात पाहिलं तर पाच ते सहा टन पर्यंत येऊ शकते.आपण याची विक्री किलोच्या प्रमाणात पण करू शकतो किंवा जुड्या च्या प्रमाणात पण विक्री करू शकतो.

आपण जर सहा ते सात वर्षापासून पाहिलं तर गर्मीच्या दिवसात बंडल पंधरा ते वीस रुपयापर्यंत विकते.आणि पावसाच्या काळात दोन ते दहा रुपये पर्यंत व्यक्ती आपण जर पाहिलं तर आपणास अशाप्रकारे एक एकरामध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाखांचे उत्पादन आपण एक वेळेस घेऊ शकतो. अशाप्रकारे जर आपण हे उत्पादन एका सीजन मध्ये दोन ते तीन वेळेस त्याच जागेवर पुन्हा पुन्हा घेतले.तर आपणास एकरी सर्व खर्च जाऊन पाच लाखांचा फायदा होऊ शकतो Coriander Farming.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने