High Tech Farming : हायटेक फारमिंग करून आज हा शेतकरी करत आहे ४०० कोटींची उलाढाल

High-tech farming


High Tech Farming : नमस्कार शेतकरी मित्रांनो आजकाल आपण पाहतो शेतातील काम असो किंवा शेती असो याकडे बरेच शेतकरी दुर्लक्ष करतात.म्हणतात ते काय खरं नाही राहील शेतीच काही नाही कितीही कष्ट करून तर असे नाही. आपण आज जाणून घेऊया एक शेतकऱ्यांशी श्री.ज्ञानेश्वर बोडके कशी शेती करतात.कशा प्रकारे त्यांनी कष्ट करून त्यांनी आज 103000 इतके शेतकऱ्यांना रोजगार उभा करून दिला. हे काय आहे त्यांच्या जीवनातील कष्ट हे जाणून घेऊया काही त्यांनी हायटेक फरमिंग पासून खूप प्रमाणात लाभ मिळाला.

आज,कोण आहेत श्री.ज्ञानेश्वर बोडके:-

श्री ज्ञानेश्वर बोडके कोण आहेत?आज का यांचे नाव शेतीच्या क्षेत्रात पसरले आहे तर हे एक प्रगतशील शेतकरी आहेत जॅकी अभिनव फार्मर्स क्लब चे निर्माते आहेत.या क्लबचा निर्माण 2014 मध्ये 850 शेतकऱ्यांनी मिळून तयार केला होता.परंतु आज या क्लब मध्ये 103000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा एक सहकारी प्रयत्न बनला आहे.जो लाखो शेतकऱ्यांना रोजगार उभा करून देतो या ग्रुपला अनेक प्रकारचे पुरस्कार भेटले आहेत. तर ही आहे या शेतकऱ्याची आज शेतीच्या क्षेत्रात ओळख.

कसे त्यांनी संघर्ष करून हे सर्व उभा केले High Tech Farming:-

श्री न्यानेश्वर बोडके आपल्या वडिलांबरोबर पारंपारिक शेती करत होते परंतु जास्त भांडवल मिळत नसल्याने त्यांनी ऑफिस बॉय ची नोकरी जॉईन केली पण त्यांची इच्छा होती की आपण शेतकऱ्यांसाठी काय वेगळं करावं आणि त्यांनी नोकरी सोडून शेतीकडे वळले. त्यानंतर त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आणि पॉली हाउस मध्ये फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट सुरू केला.आणि इथून सुरुवात झाली हायटेक फर्मिंग ची त्यासाठी सर्व ज्ञान त्यांनी सर्वे करून घेतले आणि त्यांनी पहिल्या वर्षीच १०लाख कर्ज फेडले. त्यानंतर त्यांनी अकरा लोकांना एकत्र घेऊन NABARD मदतीने अभिनव फार्मर्स क्लब ग्रुप सुरू केला त्यामुळे जबाबदाऱ्या वाटून मिळू लागला.

शेतकऱ्यांचा हातभार त्यांना मिळाला.कामे जास्त होऊ लागली. यानंतर चांगल्या नफ्यामुळे त्या ग्रुपमध्ये शेतकरी वाढत गेले या ग्रुपपासून प्रत्येक शेतकऱ्याला पहिल्या  पेक्षा जास्त नफा मिळू लागला.रोजगार निर्माण झाल्याने महिला बचत गट शामिल करण्यात आली.व अशाप्रकारे या ग्रुप ला भरभराटी मिळाली.महाराष्ट्रात यांच्या यशाची चर्चा खूप जास्त प्रमाणात होऊ लागली. नंतर या ग्रुप ला NABARD ने नॅशनल अवॉर्ड देण्यात आला.त्यानंतर एगझोटिक vegetable ने त्यांचा व्यवसायाची भरभराट वाढली.आता त्यांचा ग्रुप दररोज फळ - भाज्या पॅक करून ऑर्डर प्रमाणे होम डिलिव्हरी पण दिली जाते High Tech Farming.


श्री. ज्ञानेश्वर बोडके याच्या मते अशी करायला हवी शेती :-

त्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची शेती सुरुवात होईल आर्थिक रित्या स्वतःच्या बाकीच्यांना रोजगार उभा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.आपण शेतकऱ्याला काम वाटून दिलेले कामे जास्त होते आणि नफा पण वाढतो.
ते म्हणतात त्याचा फायदा जास्त होतो त्यामुळे गावातील पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह तयार करा आणि त्यांनी NABARD किंवा ATMA (एग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी) ला जॉईन व्हावे. यांनी शेतकऱ्याला शेती करण्यासाठी चांगल्या प्रकारे दिशा मिळून जाते आणि दुसरा म्हणजे शासनाच्या योजनांचा लाभ मिळून जातो.

त्यांच्या मते फळ फुल,भाज्या,दूध आणि धान्य इत्यादी प्रत्येक शेतकऱ्याने काम वाटून घेतले;तर शेतकऱ्यावर ची जिम्मेदारी ही कमी होते आणि जास्त प्रमाणात उत्पंनाचा जास्त मोबदला मिळू शकतो.व नफा वाढतो.काम जास्त प्रमाणात होते आणि ग्राहकापर्यंत आपला जास्तीत जास्त प्रमाणात पोहचू शकतो.आणि त्यामुळे आपणास नफा पण जास्त होतो.

या शासनाच्या योजनांचा लाभ शेतकरी शेतीसाठी घेऊ शकतो High Tech Farming:-

हायटेक शेतीसाठी शेतकरी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन किंवा बोर्ड हार्टीकल्चर मिशन या योजनांद्वारे शेतकऱ्यांना या शेतीत एक महत्त्वपूर्ण मदत म्हणून भेटते. या प्रकारची योजनांमुळे पण शेतकऱ्याला लाभदायी प्रमाणात मिळते. याचबरोबर स्टेट मार्केटिंग बोर्ड हे,ट्रांसपोर्टेशन आणि पॅकिंग असो किंवा ग्रेडिंग असो यासाठी मदत करते.

विक्री आणि मार्केटिंग:-

मोबाईल टेक्नॉलॉजी चा वापर: या ग्रुप चे यश पाहून IIT मुंबई ने त्यांच्या साठी एक ॲप तयार करून दिले.या ॲप च्या मदतीने त्यांची मार्केटिंग वाढली गेली.या ॲप चा वापर शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या शासनाच्या योजना असो,अनुदान असो यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.याने शेतकऱ्याला खूप मदत भेटू लागली.
त्याचबरोबर ऑर्डर असो,किंवा शेतीसाठी योग्य माहिती, छोट-छोटे व्हिडिओद्वारे मदत मिळते.आणि महत्त्वाचे म्हणजे या ॲप द्वारे नवीन पिढीतील तरुणासाठी वेबसाईट
तयार करून मार्केटिंग करणे.असा अनेक प्रकारचे उपयोग या ॲप द्वारे केले जातात.

पॅकिंग आणि ग्रेडिंग High Tech Farming:-

यांनी या साठी महिला बचत गटा द्वारे मदत घेऊन लेबर व्यवस्था केली जाते आणि या बचत गटा द्वारे पॅकिंग,हार्वेस्टिंग आणि ग्रेडिंग केली जाते.हे काम सोपे आणि किचकट असल्याने महिलांना सोपे जाते आणि कमी कष्टात रोजगार उभा होतो.
या अशा उत्पादनामुळे त्यांचा फायदा आणि मागणी जास्त होतो:-

  1. 100% स्वच्छ आणि फर्टीलाईजर मुक्त किंवा सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवणे.
  2. पॅकिंग करताना बाळगली जाणारी स्वच्छ्ता.
  3. ग्रेडिंग, ट्रान्सपोर्टची सुविधा
  4. लेबर वाचवण्यासाठी मशिनिकरण आणि ऑटोमोशन संपूर्ण फायदा जितका होईल तितका करणे अनिवार्य आहे. उदा.ट्रॅक्टर, छोट-छोटे पावर ट्रेलर्स,मलचींग मशीन, प्लांटिंग,बेड बनवण्यासाठी मशीन या सर्वांच्या उपयोगाने लेबर कमी होऊ शकते.

या अशा प्रकारच्या उत्पादनामुळे शेतकऱ्याला फायदा आणि ग्राहकाला पण 100% स्वच्छ आणि पोषक अन्न मिळू शकते.अशाचप्रकारे हायटेक शेती चा अर्थ म्हणजे कमीत-कमी पाणी,कमीत - कमी फर्टीलाईजर आणि लेबर आवश्यक प्रमाणात वापरून शेती करणे. तर आपण जाणून घेतला की कशा प्रकारे आपण शेती करून सुद्धा बनू शकतो High Tech Farming.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने