Poultery Farming Subsidy : कुक्कुटपालन योजनेंतर्गत किती मिळणार अनुदान | कुक्कुटपालन योजना 2022

Poultery Farming Subsidy
Poultery Farming Subsidy

Poultery Farming Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहिले तर,एक महत्त्वपूर्ण असा आपल्या व्यवसायासाठी किंवा बिझनेस प्लॅन म्हणून कुक्कुटपालन हे केले जाते.आणि याच याचा अनुदान पण शासनाकडून दिले जातात आणि आता आपण याच योजनेच्या अनुदानाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट(Poultery Farming Subsidy) जाणून घेणार आहोत.

अशाप्रकारे राबवली जाते :-

शेतकरी मित्रांनो कुक्कुटपालन ही अनुदान योजना(Poultery Farming Subsidy) राज्यांमधील 302 तालुक्यातील राबवली जाते.आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर विकास गटाची स्थापना करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.आणि याच्या साठी 2019 करिता जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अर्ज मागवले जात आहेत.

कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू? Poultery Farming Subsidy :-

आपण याच्या मध्ये शासनाच्या अपडेट मध्ये मागे होते,की सांगली जिल्हा करिता 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.आणि आता याच योजनेच्या अंतर्गत उस्मानाबाद जिल्हाकरिता 31 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या योजनेकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, कळंब,उमरगा,भूम आणि परांडा हे तालुके पात्र आहेत. आणि या ठिकाणी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर ती सधन विकास गटाची स्थापना करण्यासाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात आले आहेत.ज्याच्या मध्ये प्रति तालुका एक याप्रमाणे पाच लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे

आणि याच्यासाठी आपण पाहिलं तर सदर योजनेची मार्गदर्शक सूचना,अर्जाचा नमुना आणि बंधपत्राचा नमुना पशुधन विकास अधिकारी(वि) पंचायत समिती तुळजापूर,कळंब,उमरगा,भूम आणि परांडा यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

किती अनुदान मिळणार? Poultery Farming Subsidy :-

आपण पाहिलं तर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे.या योजनेच्या अंतर्गत प्रकल्पाच्या उभा करण्याची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये आहे.आणि आपण जर पाहिलं तर शासनाकडून यासाठीच आणि 50 टक्के म्हणजेच पाच लाख 13 हजार रुपये 750 रुपये इतके दिले जाते. शेतकरी मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये कुकुटपालन करणारे,व्यवसायिक त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना कडे सध्या लघु-अंडी उबवणी यंत्र आहे.अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.आणि अशाच लाभार्थ्यांची निवड योजनेअंतर्गत अनुदानासाठी केली जाते.

अर्ज कसा करावा?

आपण पाहिलं तर या योजनेचे मार्गदर्शक सूचना,अर्जाचा नमुना आणि बंधपत्राचा नमुना पशुधन विकास अधिकारी(वि) पंचायत समिती तुळजापूर,कळंब,उमरगा भूम  आणि परांडा यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.आणि यासाठी जे कोणी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील.त्या लाभार्थ्यांना पंचायत समितीचे कार्यालयातून द्यायचा आहे. आणि आपण पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 असणार आहे.

तर शेतकरी मित्रांना पण जर बघितलं तर त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातील सुद्धा या योजनेचे अर्ज मागवण्यात येत आहेत.आपल्या जिल्ह्याचे सुद्धा जर अर्ज सुरू असतील. तर आपण पंचायत समितीच्या अधिकारी चौकशी करून, मोठ्या प्रमाणात अनुदान देणाऱ्या या महत्त्वपूर्ण अशा योजनेचा लाभ घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो कुकुटपालन योजनाच्या अनुदानाचे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असे अपडेट होते.आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो, Poultery Farming Subsidy धन्यवाद.....!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने