शेतकरी मित्रांनो आजकाल बऱ्याच फेक बातम्यांद्वारे तुम्हा पर्यंत चुकीचे मेसेज येतात व ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सांगतात व याचा फायदा न होता आपली सर्व माहिती दुसरीकडेच कुठे जाऊ शकते.व नंतर आपणास याचे काही दुष्परिणाम भोगावे लागू शकतात परंतु तुम्ही निश्चिंत रहा.ही ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज फक्त महा DBT पोर्टल द्वारेच केले जातात जे की महाराष्ट्र शासनाचे आहे आणि यापासून तुम्हाला कोणताही तोटा होऊ शकत नाही.
तर चला आपण जाणून घेऊया की कसा तुम्ही तुमचा ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता.आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्जाचे रेजिस्ट्रेशन तुमच्या मोबाईल वर करू शकता पण बाकी पुढील सर्व स्टेप्स ही तुम्ही गावातील किंवा जवळच्या केंद्रात करा कारण काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावे लागतात व एका चुकीमुळे तुम्ही अपात्र ठरू शकता.म्हणून काळजीपूर्वक अर्ज भरा.यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ मिळेल.
✓कोण आहे पात्र:-
- शेतकऱ्यांचे असणे अनिवार्य आहे.
- शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8-अ असणे गरजेचे आहे.
- शेतकरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा असेल तर जातीचा दाखला असणे गरजेचे आहे
- फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा अवजार किंवा यंत्र
- कुटुंबाच्या व्यक्ती ट्रॅक्टर नावावर असल्यास,ट्रॅक्टरचलीत अवजरासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल,परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
- एखाद्या घटकासाठी किंवा औजरासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक किंवा अवजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
उदा.एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टर साठी लाभ देण्यात आलेला असेल तर पुढील दहा वर्षे ट्रॅक्टर साठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभपात्र राहील.
हे पण पहा,कोण आहे अतिवृषटी पीक विमा साठी पात्र
~ही कागदपत्रे आहेत गरजेचे:-
१) आधार कार्ड
२) 7/12 उतारा
३) 8-अ दाखला
४) खरेदी करावयाच्या औजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
५) जातीचा दाखला (अनु.जाती आणि अनु. जमातीसाठी)
६) स्वयं घोषणापत्र
७) पूर्व संमतीपत्र
या वेबसाईटवर तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज भरू शकता.
👇👇👇👇👇👇👇👇
पाहण्यासाठी,कोण आहे पात्र येथे क्लिक करा
या वेबसाईटवर गेल्यावर खाली अनुदान हेडिंग च्या खाली view benefits वर क्लिक केल्यानंतर पाहू शकता की तुम्ही येथे पाहू शकता की कोणाला किती एचपी चा ट्रॅक्टर साठी अनुदान मिळणार आहे.
👇👇👇👇👇👇👇👇
पहा किती एचपी चे ट्रॅक्टर मिळणार तुम्हाला येथे क्लिक करा
यूट्यूब वर व्हिडिओ येथे पाहू शकता.
👇👇👇👇👇👇
पाहण्यासाठी येथे क्लिक करा.