land record || १८८० पासूनचे नवीन बदल केल्याले सातबारे ८- अ उतारे करा आपल्या मोबाईल वर डाऊनलोड!

 


तुम्ही जर ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर, सातबारा, नोंदी, आठ-अ चा उतारा, शेती मापन अशा गोष्टी नेहमी ऐकत असणार. परंतु अनेकांना याची पूर्ण माहिती नसते. आपण याची काहीही काळजी करू नका कारण तुम्हाला या माहितीचा पुरेपूर फायदा होणार आहे,हे जाणून घेण्यासाठी आठ अ चा उतारा म्हणजे असतो.काय आहे सातबारा तो कसा वाचायचा याची माहीती मिळवणार आहात.

                             साधारणपणे आपल्याला सातबाऱ्यातुन जमिनीची मालकी हक्क,त्या जमिनीवरील पिके,एकूण क्षेत्र, त्या जमिनीवर किती बोजा(कर्ज) आहे.अशा अनेक गोष्टी कळतात. पण अनेकांना आठ अ चा उतारा नक्की काय असते ते कळत नाही. तो कसा काढायचा ही माहिती नसते. त्याचा काय फायदा काय असतो याचीदेखील पुरेपूर माहिती नसते.चला घेऊया जाणून, आठ च्या उताऱ्यावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या त्या गावातील जमिनींविषयी सगळी माहिती मिळते,ती त्याच्या गट नुंबरवरून काढता येते.

आठ-अ चा फायदा:

 १) एकाच मालकाची वेगवेळ्या गटात असलेली एकूण जमीन कळते. 

२) प्रशासनाला कर गोळा करण्यासाठी उपयुक्त 

३) जमीन घेताना फसवणुकीची चिंता नाही,ती जमीन कोणाच्या नावावर आहे ते या आठ-अ च्या माहितीवरून कळते,आणि आपणास फसवणुकीपासून सतर्क राहता येते.


हे आहेत बदल सात- बारा आणि ८ अ :-

~वरच्या बाजूला शासनाचा लोगो व ई-महाभूमीचा वॉटरमार्क. 

~गावाच्या नावासोबत लोकल गवर्नमेंट डिरेक्टरी कोड, लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र अ +ब स्वतंत्र दर्शवणार. 

~शेतीसाठी हे.आर. चौ. मी. आणि बिनशेतीसाठी आर. चौ.मी हे एकक दर्शविले जाणार. 

~खाते क्रमांक खातेदारांच्या नावासोबत नमूद करणार. कमी केलेली नावे खोडवणार.

~नमुना ७ वर नोंदलेले परंतु निर्गत न झालेले प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शवण्यात येणार. 

~भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकही फेरफार प्रलंबित नसल्यास तसा उल्लेख करणार.

 ~नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटा फेरफार क्रमांक व त्याता दिनांक इतर हक्क रकान्याचे खाली शेवटच्या रकान्यात दर्शवणार.


आठ अ चा उतारा कसा मिळवायचा:

१) https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन पुढील स्टेप्स नुसार मिळवा.
२) तुमचा विभाग निवडा.
३) आठ अ वर क्लीक करा.
४) त्यांनतर जिल्हा निवडा, तालुका निवडा आणि गावावर क्लिक  करून गाव निवडा.
५) खाते नंबर वर क्लीक करून तो छोट्या बॉक्समध्ये लिहायचा
६) त्यांनतर शोध म्हणजेच सर्च बटण वर क्लिक करून तुमहाला तुमचा आठ अ चा उतारा मिळतो.

७) मंग उतारा तुम्ही pdf च्या फॉम् मध्ये डाऊनलोड करू शकता.आणि त्याचा पुरेपूर वापर करू शकता! तुमच्या कामाला.


                 यूट्यूब वर व्हिडिओ पाहण्यासाठी

                      👇👇👇👇👇👇👇

                            येथे क्लिक करा

हे ही पहा शेतीची अत्याधुनिक पद्धत, तरुणांचा नव्या बिजनेस पद्धतीची शेती,तरुण पिढीला एक नवी दिशा, मोठ्या प्रमाणात आजच्या मोठमोठ्या शेतकर्यांची निवड


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने