सेंद्रिय खतांचा वापर करून मिळवा लाखोंचा फायदा,मिळवा डाळिंब उत्पादन माहिती. || सेंद्रिय शेती ||

 डाळिंबाची करा सेंद्रिय पद्धतीने शेती ना जमिनीस    रासायनिक खतांपासुन धोका.


✓घ्या, आधी जाणून डाळिंबाचे महत्त्व:-

डाळिंबातील अन्‍नघटक

डाळिंब फळात दाण्‍याचे प्रमाण ६८% असून त्यात वेगवेगळ्या प्रकारचे अन्‍न घटक असतात ते खालीलप्रमाणे:-

अ.क्र.         अन्‍नघटकप्रमाण
1)              पाणी-78.2 टक्‍के
2)              प्रथिने-1.6 टक्‍के
3)              स्न्ग्धि पदार्थ0.1-टक्‍के
4)              तंतुमय पदार्थ-5.1 टक्‍के
5)              पिष्‍टमय पदार्थ14.5-टक्‍के
6)              खनिजे0.7-टक्‍के
7)              कॅल्शियम10-मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
8)              मॅग्‍नेशियम12-मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
9)              ऑक्‍झॉलिक असिड-14 मि.ली.ग्रॅम/100ग्रॅम 10)            स्‍फूरद70 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
11)            लोह0.3 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
12)            व्हिटॅमीन ए0.06 मि.ली.ग्रॅम/100ग्रॅम
13).           रिबोल्‍फेविन बी-20.1 मि.ली.ग्रॅम / 100ग्रॅम 14)            निकोटीनीक ऍसीड0.3 मि.ली.ग्रॅम / 100ग्रॅम 15)            क जिवनसत्‍व14 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम

ट्यानीनचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात,डाळिंबाच्या प्रत्येक भागात असते आणि त्याचा फायदा हा कपडे रंगवण्यासाठी होतो.

=अशी करा डाळिंबाची सेंद्रिय शेती:-

अशा हवामानाची आवश्यकता:-

डाळींबाचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे. उन्‍हाळयातील कडक उनाची आणि कोरडी हवा पण फायद्याचे वााातावर ठरते.तसेच हिवाळयातील कडक थंडी डाळिंबाच्‍या वाढीस योग्‍य ठरते. अशा प्रकारच्या हवामानात चांगल्‍या प्रकारची आणि उच्च प्रतीची फळे तयार होतात.अशा प्रकारच्या हवामानात थोडाफार बदल झाल्याने फळांवर काहींही फरक पडत नाही.फुले लागल्‍यापासून फळे होईपर्यंतच्‍या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्‍यास चांगल्‍या प्रकारची गोड फळे तयार होतात. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात जेथे थोडीफार ओली जमीन आढळून येेथे तेथे डाळींबाच्‍या लागवडीस भरपूर पीक येऊ शकते कारण तेेेेथे उष्ण व कोरडे वाातावरण असल्याामुले तेथे पीक चांगले येते.व अशा पीकला मागणीत पण वाव मिलतो.

आशा आणि सौम्य सौम्य हि सामान्य आर्द्र आणि उष्ण सकारात्मक डाळंबाचा आदर्श असतो. २५-३५०से दरम्यान तापमान आणि ५००-८०० मिमी पाऊस असलेल्या प्रदेशात डाळींबाची यशस्वी लागवड केली जाऊ शकते. फळांची वाढ होत असताना उष्ण व कोरडे हवामान असण्याची गरज असते याने फळाचा दर्जा सुधारतो व फळ मोठे आणि लालसर दाणे बनतात.

अशा जमीनीची निवड करा:-

डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेण्‍यात येऊ शकते.अगदी निकस,अगदी कमी निकस जमिनीपासून तर भारी जमिनीपर्यंत, मध्‍यम काळी व पीक घेण्या योग्य जमिन डाळींबाच्‍या लागवडीसाठी चांगली ठरते,परंतु पाण्‍याचा चांगल्या प्रकारे जर जिर होत असेल किंवा गाळ होणारी गाळाची जमीन किंवा पोयटयाची जमिनीचा निवड केल्यास उत्‍पन्‍न चांगले मिळू शकते. त्‍ याचप्रमाणेच हलक्‍या प्रकारच्या, मुरमाड असलेल्या,माळरान किंवा डोंगर उताराच्‍या जमिनी पण या पिकाला लाभदायक ठरतात. मात्र जमिनीत पाण्‍याचा चांगल्या प्रकारे जिर(पाणी चांगल्या प्रकारे मुरणे) होणे आवश्‍यक आहे. 

पाण्याचे अशे करा व्यवस्थापन:-

डाळींबाच्या पिकास फुले येण्‍यास सुरुवात झाल्याच्या नंतर फळ  उतरुन घेईपर्यंतच्‍या काळात नियमितपणे व पुरेसे गरजेनुसार पाणी देणे महत्‍वाचे ठरते.पाणी देन्याच्या काळात अनियमितपणा आढळून आल्यास फुलांची गळती होण्‍याची शक्‍यता वाढते. 

            फळांची वाढ होण्याच्या काळात पाण्‍याचा कमीपणा पडून नंतर एकदम एकाच वेळेस भरपूर पाणी देण्यात आल्यास फळांना तडे आणि रेषा पडतात व प्रसंगाणे अशी न पिकलेली फळे गळून पडतात.पावसाळयात पाऊस कमी प्रमाणात पडल्यास जरुरी आहे तितके पाणी द्यावे व पुढे फळे तोडणीपर्यंत 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने पाण्‍याची पाळी कमी पडू न देणे फायद्याचे ठरते. फळाची तोडणी संपल्‍यानंतर बागांचे पाणी तोडावे किंवा एकदम कमी प्रमाणात दिले तरी पण चालते.

अशा पिकाच्या लागवडीच्या उत्पादनाचा व्हिडिओ पाहण्यासाठी

👇👇👇

 येथे क्लिक.👈 करा            👈

तुम्ही या डाळिंबाच्या जातींचे उत्पादन घेऊ शकता.

१) गणेश

२) मस्कत

३) मृदुला

४) जी-१३७

५) फुले आरक्ता

६) भगवा

७) ज्योती (जी. के. व्ही.के.-१)

इतर महत्‍वाचे मुददे:-

~रोपांची खरेदी खात्रीशीर शासनमान्‍य रोपवाटीकेतून करावी.

~अधिक आर्थिक फायदयासाठी 4.5  x 3.0 मिटर  अंतरावर लागवड केलेल्‍या डाळींबामध्‍ये ठिबक सिंचनाने झाडाजवळचे 20 टक्‍के क्षेत्र असावे

✓ही कारणे असू शकतात तुमच्या पिकाला मर रोग होण्याची:-

>फयूजेरियम बुरशिचा प्रादुर्भाव होणे.

> खोडास लहान छिद्र पाडृणारे भूंगेरे यांचा प्रादूर्भाव हा जास्त प्रमाणात होऊ शकतो यामुळे झाड जळण्याची जास्त शक्यता असते.                


>आंतरमशागतीचा अभाव

>रोगग्रस्‍त कलमांची लागवड

>पाण्‍याचा जास्त प्रमाणात  निचरा न होणा-या भारी प्रकारच्या जमिनीत डाळींबाची लागवड.

>चुनखडीयुक्‍त जमिनीत लागवड.

>दोन झाडातील अंतर कमी राहणे  म्‍हणजे 5 × 5 मीटर पेक्षा अंतर कमी राहणे हे सुद्धा रोग जास्त पासरण्याचे कारण असू शकते त्यामुळे आवश्यक अंतर ठेवणे गरजेचे असते.

>शिफारशी पेक्षा जास्‍त पाणी वापर.


अ) प्रतिबंधात्‍मक उपाय-

~डाळींब लागवडीसाठी पाण्‍याचा चांगला निचरा होणा-या     जमिनीची निवड करावी.

~भारी व चोपण प्रकारच्या जमिनीत डाळींबाची लागवड करु नये.

~शिफारशीप्रमाणे 5 × 5 मीटर अंतरावरची लागवड महत्त्वाची असते.

 शिफारशीप्रमाणे पाणी व्‍यवस्‍थापन करावे.

~लागवडीसाठी रोग व सूत्रकृमीमुक्‍त कलमांची निवड करावी.

~लागवड करताना लागवडीच्‍या अगोदर कलमांच्‍या पिशव्‍या   मातीसह एक टक्‍का बोर्डो मिश्रणात बुडवून नंतर लागवड करावी.

~लागवडीच्‍या वेळी निंबोळी पेंड, शेणखत, कॉपर   आक्‍झीक्‍लोराईड आणि ट्रायकोडर्माचा शिफारशीप्रमाणे वापर   करावा.

~फयूजेरियम, सूत्रकृमी, खोडास लहान छिद्रे  पाडणारे भूंगेरे   आणि खोड किडा यांचे वेळीच नियंत्रण करावे.

~मर झालेली झाडे त्‍वरीत काढून टाकावीत.


~द्वितीय पिकाची लागवड केव्हा करावी.

जमीनहलकी ते मध्‍यम (45 सेमी खोलीपर्यंत माती असलेली हलकी जमीन) असली तरी चालेल.जाती=गणेश,जी -137,मृदूला, फूले आरक्‍ता,भगवा लागवडीचे अंतर 4.5 x 3.0 मिटर असावे. वाढलेल्‍या झाडास 40 ते 50 किलो, नत्र 625 ग्रॅम, स्‍फूरद 250 ग्रॅम व पालाश 250 ग्रॅम प्रतिझाडास प्रतिवर्ष देणे आवश्यक असते.नत्र दोन समान हप्‍त्‍यात विभागून वेळेवर दयावेत.आंतरपिके झाडाच्‍या लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षे तुम्ही बागेत दोन ओळींमध्‍ये कांदा पीक,काकडी पीक,मुग पीक, चवळी पीक,सोयाबिन पीक यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके घ्‍यावीत.याचा फायदा तुमचे भांडवल वाढवण्यात होईल.याचा फायदा नक्की तुम्हाला होईल.


•अशे करा खत व्यवस्थापन:=

- डाळींबाच्‍या प्रत्‍येक झाडास खालील प्रमाणे रासायनीक खते द्यावीत.ही खते झाडांच्या वाढीसाठी गरजेचे असतात.म्हणून यांचा वापर कमी प्रमाणात करावी यामुळे याचा कोणताही परिणाम आपल्या सेंद्रिय शेतीला होणार नाही.

नत्र,स्‍फूरद,पालाश पहिल्या चार वर्षांसाठी अनुक्रमे:-
वर्ष.     -.  नत्र, स्पुरद,पालाश
१ ले वर्ष-1125 ग्रॅम,125 ग्रॅम, 125ग्रॅम
२ रे वर्ष -2250 ग्रॅम,250 ग्रॅम,250 ग्रॅम
३ रे वर्ष-3500 ग्रॅम,250 ग्रॅम,250 ग्रॅम
४ थे वर्ष-4500 ग्रॅम,250 ग्रॅम,250 ग्रॅम

 त्‍या शिवाय 5 वर्षानंतर झाडाच्‍या वाढीनुसार प्रत्‍येक झाडास 10 ते 50 किलो शेणखत(बाकी खतांचा कमी आणि शेणखताच्या जास्त वापर करू शकता)आणि 600 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्‍फूरद व 250 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे.

- पूर्वी  काळात डाळिंबाच्या झाडांना रासायनिक जास्त प्रमाणात व सेंद्रिय खते कमी प्रमाणात दिली जायची. मात्र गेल्या काही वर्षापासून सेंद्रिय खतांचा वापर हा वाढवला गेला आहे. प्रत्येक झाडास  तुम्ही दोन पाट्या शेणखत देऊ शकता,तसेच शेणखतात कोंबडीखत व बाजारातील सेंद्रिय खतांचा वापर तुम्ही करू शकता.

                  




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने