|Bell pepper farming|ढोबळी मिरची शेती अशी करा मिळवा लाखोंचा फायदा| ढोबळी मिरची

Bell pepper farming

नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला आपण जाणून घेऊया की ढोबळी मिरची शेती कशी केली जाते. या पिकाची लागवड केव्हा करावी आणि का त्याच काळात करावी, कशी जमीन आवश्यक असते, कशे हवामान या पिकासाठी पूरक ठरते
ढोबळी मिरचीचा रंग गडद हिरवागार असतो.या मिरचीची चव चांगली लागणे यात शास्त्रीय कारण म्हणजे त्यात असलेले कॅप्सिनचे.या कॅप्सिनच्या प्रमाणावर या ढोबळी मिरचीची चव ठरते. 2-4% पर्यंत शेतकरी ही शेती भारतात करू लागले आहेत.आणि पारंपरिक पिकासोबत या पिकाची लागवड पण भारतात आज बरेच शेतकरी करू लागले आहेत.

        चला तर आपण जाणून घेऊया मार्केट मध्ये चांगलीच मागणी असणारे हे भाजीपाल्यातील पीक ढोबळी मिरची जिला शिमला मिरची सुद्धा म्हटलं जात,या पिकाची शेती कशी करावी.

अशी करा शेती:-

•या पिकासाठी असते अशा हवामानाची गरज:-

या ढोबळी मिरचीला म्हणजे सिमला मिरचीला दिवशी तापमान जास्तीत जास्त 25°C पर्यंत लागते आणि रात्रीचे तापमान 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत लागते.एवढे तापमान या पिकाच्या वाढीसाठी पूरक असते.या पेक्षा कमी झाल्यास या पिकावर अशा वातावरणाचा परिणाम होतो.व या पिकाचे नुकसान जास्त प्रमाणात होऊ शकते.

•अशा जमीनीची निवड करा:-

ढोबळी मिरची साठी भारी कसदार व चांगली पीक येणारी जमीन असावी. जास्त किंवा मध्यम काळीची असेल तरी चालेल.पाण्याचा एकदम चांगला निचरा होणारी निवडावी. नदीकाठच्या किंवा मोठ्या वड्या शेजारच्या सुपीक अशा जमिनी आणि Ph(सामू) 6-7 च्या दरम्यान असावा जास्त किंवा कमी या पिकास पूरक ठरत नाही.

•या वेळेस या पिकाची लागवड करणे आवश्यक असते:-

सिमला मिरचीची(ढोबळी मिरची) लागवड ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात केली जाते.कारण त्याच्या पिकाची
सुरुवात थंडीच्या दिवसात होते व थंडीच्या दिवसातील दिवसाची आणि रात्रीचे तापमान हे त्यासाठी पूरक ठरते, आणि मिळणाऱ्या फळाची वाढ चांगली होऊन क्वालिटी चांगली बनते.

ही पण शेती पाहू शकता या भाजीला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव ८०००० प्रतिकीलो•अशी लागवड करावी:-

या पिकासाठी जमिनीची पूर्वमशागत करणे खूप महत्त्वाचे ठरते. यापूर्वी मशागतीमुळे जमीन कसदार आणि मोकळीची होते याने पिकाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्याने झाडांची योग्य वाढ होऊन पीक चांगल्या प्रकारे येते.या पीकाची आपल्याला पहिल्यांदा रोपांच्या स्वरूपात लागवड करावी लागते.यासाठी अशा रोपांची निवड करावी:-
१) हिरवीगार आणि जोमदार
२) कीड लागलेली नसावी.
३) चांगल्या रोपवाटिकेतून(शिक्षित/अनुभवी रोपवाटिका    मालकाकडून)
४) रोपाला कोणत्याही प्रकारचा रोग नसावा.
५)रोपाची वाढ जास्तीत-जास्त ४-५ आठवड्याची असावी.
६) रोपाची जात निवड उदा.अर्का गौरव, अर्का मोहिनी इ.
• लागवडीसाठी या जातीच्या रोपांची निवड करू शकता:-
१) कॅलिफोर्निया वंडर   २) अर्का मोहिनी    ३) अर्का गौरव

या अशी पूर्व मशागत ही आडवी आणि उभी नांगरट हाणून, त्यामधील बाकी कामा न येणारा कचरा जसे की दुसऱ्या पिकाची कड्या, बुड किंवा लवकर त्याचे खत न होणे जोगी असे सर्वकाही बाजूला करणे.आणि त्या मातीत हेक्‍टरी 15 ते 20 टन शेणखत टाकावे.याने मातीत पूरक असे घटक पिकाला वाढीच्या वेळेत मिळतात.
आणि हे तुम्हाला या पिकासाठी पुन्हा दोन-तीन वर्षी कामी येऊ शकते.या पिकाची लागवड तुम्ही शेडनेट हाऊस उभा करून किंवा मोकळ्या रानात पण करू शकता. यामुळे तिची रोपांची लागवड ही उभे बेड पाडून करावी लागते. तुम्ही पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून मल्चिंग पेपर वापरून रोपे लावावी.


✓या पिकासाठी आंतरमशागतेचे महत्त्व:-

ढोबळी मिरची(शिमला) या मिरचीला चुरडा-मुरडा नावाचा रोग हा या पिकाला चांगलाच बळी पडतो.त्यासाठी या पिकासाठी जमीन स्वच्छ ठेवणे आवश्‍यक ठरते आणि       झाडांना मातीचा जास्तीत जास्त आधार देणे अनिवार्य असते.त्यानंतर झाडे मोठी आणि पिकाला लागल्यास त्याला तुम्ही वरच्या साईडने दोरीने बांधून टाकू शकता.
ढोबळी मिरची शेतीसाठी या महत्त्वाच्या बाबी असतात जसे की पिकाला मातीचा आधार देणे, पिकाची पाने कापणे,झाडाला दोरीचा आधार देणे इत्यादी.

•अशे करा खताचे व्यवस्थापन:-

कथे मातीचे परीक्षणानंतर प्रमाण ठरवून देऊ शकता. 150 किलो-नत्र,150 किलो-स्फुरद आणि 200 किलो-पालाश आणि 15 ते 20 गाड्या चांगल्या मुरलेले शेणखत तुम्ही पिकासाठी देणे पूरक प्रमाणात ठरते.यातील सगळे स्फुरद आणि पालाश व अर्धे नत्र पिकाची लागवड करताना द्यावे.
                              आणि अर्धे उरलेले नत्र लावडीच्या नंतर महिना व 50 दिवसांच्या समान दोन वाटे करून द्यावे.

•पाण्याचे व्यवस्थापन:-

या पिकासाठी सुरवातीच्या काळात वाढीसाठी पाण्याची प्रमाणात गरज असते.या पिकासाठी तुम्ही पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करू शकता. अशाने पाण्याची बचत होते व उत्पादनात पण मोठ्या प्रमाणात वाढ होते.

अशी करा या पिकाला होणाऱ्या रोगासाठी आणि कीड उपाय:-
१)कीड-उपाय:-


a) फुलकिड- हे किडे अतिशय लहान आणि रंगाने फिकट पिवळा असतो.पाने खरडून बाहेर येणाऱ्या रसाचे शोषण करतात.याने पान कडेने चुरमुडलेले दिसतात.
उपाय:- लावनीपासून एका आठवड्यात नंतर 15 दिवसांच्या अंतराने 8ml डायमेथोएट 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा मारावा.
b) पांढरी माशी- ही कीड खोडा मधील रसाचे शोषण करते त्याने खोड कमजोर बनून पाने गळतात आणि झाडे सुकतात.
उपाय:- प्रोफेनोफोस 15ml 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
c) मावा पडणे -
उपाय:-15ml/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे.


२)रोग-उपाय:-


a) मररोग- जमिनीत असलेल्या गोष्टीमुळे या रोगाची लागण या पिकाला होते लागण झालेल्या पिकांची रोपे हिरवेगार जात नाही मी थोडे सुकून जातात.
उपाय:-३०g/१०लिटर पाणी याप्रमाणे ऑकसीक्लोराईड मिक्स करून हे तुम्ही ठिबक द्वारे त्यांच्या मुळापर्यंत पोहोचविणे आवश्यक ठरते.

b) भुरी-पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी पावडर सारखा जमा झालेली दिसते यानी जास्त प्रमाणात धरल्यावर झाडाची पाने गळतात.
उपाय:- गंधक ३०g व 10ml कॅराथेन पाण्यात मिसळून १५दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

c) चुरडा-मुरडा-पाणी आकुंचन पावणे व पाने गोळा होतात शेंडे निस्तेज आणि झाड रोगांनी झपाटले जाते.
उपाय:- युरियाचा जास्त वापर टाळावा.हे पण पाहू शकता, मख्यमंत्री सोलर पंप योजना १००% अनुदान असा करा अर्ज.


या पिकाची काढणी केव्हा वा कशी करावी:-

या पिकाची काढणी ही फळाची संपूर्ण वाढ आणि हिरवेगार असताना करावी.आपण एक आठवड्यानंतर करू शकतो.असे आपण चार-पाच आठवड्यात करू शकतो.आणि याची काढणी जास्त तर जानेवारी,फेब्रुवारी मध्ये केली जाते.

उत्पादन:-

एका शेतकऱ्याला प्रती हेक्टरी 17-20 टनाचा लाभ होऊ शकतो.                     

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने